अभियंता मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे ५ कार्यकर्ते अटकेत ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या

ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खासगी बंगल्यावर एका अभियंत्याला झालेल्या कथित मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांची १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाइट बंद करून ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर टीका केली होती.