मुंबई : धारावीतील प्रत्येक नागरिकाची करोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. स्थानिक खासदार राहल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हा निर्णय घेतला. खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत. धारावीतील दीडशे खासगी डॉक्टरांनी पालिके च्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविल्याने येत्या १० ते १२ दिवसांत संपूर्ण धारावी परिसरातील नागरिकांची करोना चाचणी करणे पालिकेला शक्य होणार आहे.सहाय्यक आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत. खासदार शेवाळे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष डा. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल काउन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. सरेंद्र सिगनापुरकर यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
धारावीतील प्रत्येकाची होणार करोना चाचणी