पडघा(प्रतिनिधी):- भिवंडी तालुक्यातील बोरीवली जिल्हा परिषद गटातील समतानगर येथील तयार करण्यात येणा-या नवीन पेव्हर ब्लॉक रस्त्याचे भूमीपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. __ जिल्हा परिषद ठाणे यांच्या समाजकल्याण सेस फंडातून मंजूर झालेल्या पेव्हर ब्लॉक रस्त्याचे भुमीपूजन बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापती वैशाली विष्णू चंदे व बोरीवली पंचायत समिती गणाचे सदस्य मुशीर नाचण यांच्या हस्ते समतानगर येथील रस्त्यावर श्रीफळ वाढवून करण्यात आलेत्यामुळे येथील नागरिकांची खराब रस्त्याची समस्या दूर होणार असुन नागरिकांना दर्जेदार पेव्हर ब्लॉक रस्ता लवकरच उपलब्ध होणार आहे. यावेळी बोरीवली व समतानगर येथील नागरिककार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
समतानगर येथील पेव्हर ब्लॉक रस्त्याचे भूमीपूजन