ठाणे:घोडबंदर मार्गावरील वाहतुकीची धमनी मानल्या जाणाऱ्या चार प्रमुख उड्डाणपुलांच्या दुरुस्तीसाठी रस्ते विकास महामंडळाने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून येत्या पावसाळ्यापूर्वी या उड्डाणपुलांवरील रस्ते तुकतुकीत केले जाणार आहेत. या मार्गावर सुरू असणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या कामामुळे प्रवाशांना मोठय़ा प्रमाणावर वाहनकोंडीचा सामना करावा लागतो. अशातच गेल्या सहा महिन्यांपासून येथील चारही उड्डाणपुलांवर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे ही कोंडी अधिक वाढत होती. घोडबंदर मार्गावरून मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचा भार गेल्या काही वर्षांत वाढला आहे. येथून अवजड वाहनांचा राबताही वाढला असून त्यामुळे कोंडीत अधिक भर पडत आहे. या मार्गावरील वाढणारा भार लक्षात घेऊन रस्ते विकास महामंडळाने या ठिकाणी यापूर्वीच चार उड्डाणपुलांची उभारणी केली आहे.
घोडबंदरच्या पुलांची दरुस्ती