मुरबाडःकोरोना पार्श्वभूमीवर मुरबाड पोलिसांचे जनतेला खोट्या अफवा न पसरविण्या बाबत आवाहन ,कि ,आपणास कळविण्यात येते कीमुरबाडमधील कळंभे गावाच्या जंगलात नऊ अनोळखी मुस्लिम लोकं फिरत असल्याचा मंसेज सरपंच संजय गोडांबे यांच्या नावाने तालुक्यातील व्हाट्स एप्स ग्रुप फिरत आहे. त्यानुषंगाने मुरबाड पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून सदर जंगलात व परिसरातील गावांमध्ये शोध घेतला असता, अशी कोणत्याही प्रकारची माणसे दिसली नाही अथवा आढळून ही आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच सदर मंसेज माझ्यानावे कोणीतरी प्रसारीत केला असल्याचे सरपंच संजय गोडांबे यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.तसेच खोट्या अफवा पसरवु नयेत. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून दरम्यान जनतेला भयभीत तथा संभ्रमीत करणारी किंवा प्रशासनाची दिशाभूल करणारी कोणत्याही स्वरूपाची माहिती बेकायदेशीर रित्या प्रसारित केल्यास हा दखलपात्र गुन्हा म्हणून नोंदविला जाऊ शकतो.याबाबत सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. कोणत्याही स्वरूपाची शंका वाटल्यास अथवा माहिती मिळाल्यास तात्काळ मुरबाड पोलीस स्टेशनला संपर्क साधावा... मुरबाड पोलीस स्टेशन संपर्क क्रमांक :- ०२५२४ २२२२३३ असा आहे.
मुरबाड पोलिसांकडन जनतेला आवाहत !!