मॉर्निंग वॉक पडला महागात__ १९ जणांवर गुन्हा दाखल

क रोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लांकडाउनची घोषणा करण्यात आलेली असून संचारबंदीचा नियम लागू करण्यात आल्यानंतर देखील अनेक नागरिक पहाटे फिरायला निघत असल्यामुळे काशी-मिरा पोलीस ठाण्यात अशा एकुण १९ नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना देखील नागरिक घराबाहेर पडत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे