ठाणे : खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याचा दुहेरी आनंद देणाऱ्या 'लोकसत्ता ठाणे शांपिंग फेस्टिव्हल'निमित्ताने ठाणेकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. ठाण्यातील मासुंदा तलावाच्या परिसरात शनिवारी पाश्चात्त्य संगीतातून भक्तिमय वातावरण निर्माण करणारा ‘अभंग रिपोस्ट', तर रविवारी जीवनगाणीनिर्मित हिंदी आणि मराठी गाण्यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या ठाणेकरांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.