पाण्यासाठी महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

अंबरनाथ : गेल्या तीन वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करणारया काकोळे गावातील महिलांनी पाणी मिळण्याच्या मागणीसाठी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष |नरेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली | अंबरनाथ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. अंबरनाथ तालुक्यातील काकोळा गावात ब्रिटिशकालीन धरण आहे, हे धरण रेल्वे विभागासाठी बांधण्यात आले होते , सध्या तेथे रेल्वे प्रशासनाने नीर हा शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारला आहे मात्र या धरणाजवळ राहून देखील काकोळा गावातील गावकरयांना गेल्या ३ वर्षापासून पाणी समस्या भेडसावत आहे. महिलांनी तीन ते चार किलोमीटर पायपीट करून पाणी आणण्यासाठी जावे लागते . तहसीलदार कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर महिलांनी हांडे ,कळशी , कावडी घेऊन ठिय्या आंदोलन केले. त्याचप्रमाणे धरण उशालाष्कोरड घशाला , अशा घोषणा महिलांनी केल्या. यानंतर मोर्चेकर्यानी आपल्या मागणीचे एक लेखी निवेदन तहसीलदार कार्यालयात दिले , त्यावेळी त्यांना ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले ..