विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणी,निगा व देखभालीसाठी विविध समित्या गठीत करण्याचा आयुक्तांचा निर्णय

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचे शुभहस्ते ज्या प्रकल्पांचे उद्घाटन तसेच लोकार्पण करण्यात आलेत्या प्रकल्पांची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी व्हावी तसेच त्याबाबत योग्य ते धोरण ठरविता यावे आणि त्या प्रकल्पांची देखभाल योग्य रितीने व्हावी यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज विविध समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक कशा पद्धतीने चालविण्यात यावे त्याचप्रमाणे तेथे उपलब्ध असलेल्या अन्य सुविधा कशाप्रकारे चालवाव्यात यासाठी धोरण निश्चित करण्यासाठी उपायुक्त संदीपमाळ वी, मुख्य लेखा परीक्षक श्री.तायडे, उपनगरअभियंता प्रमोद निंबाळकर आणि कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदींचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली तर आपला दवाखाना याप्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी उपआयुक्त मनीश जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर, कार्यकारी अभियंता शैलेंद्र बेंडाळे या अधिका-यांची समिती गठीत केली आहे. गठीत करण्याचा ठाणे ग्लोबल इम्पैक्ट हब या स्टार्ट अप प्रकल्पासाठीउपआयुक्त ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी, अशोक बुरपल्ले, प्रमोद निंबाळकर, श्री.गोदेपुरे आदींची समिती गठीत केली आहे. सदर समिती या प्रकल्पातंर्गत उपलब्ध सुविधांबाबत धोरण काय असावे याचा अभ्यास करून आपला अहवाल तयार करणार आहे. बांधकाम व तोडफोड कचरा पुनर्र प्रक्रिया जोशी, अशोकबुरपल्ले, प्रविण पापळकर, डॉ. हळदेकर, श्रीमती मनीषा प्रधान आदी अधिका-यांची समिती गठीत केली तर घनकच-या पासून मला तर वामपन्थी पासून बीजनिर्मिती प्रकल्पासाठी मनीष जोशी, मुख्य लेखा परीक्षक श्री. तायडे, कार्यकारीअभियंता (विद्युत) शुभांगी केसवाणी आदींचा समावेश असलेली समिती गठीत केली.