१ लाख ठाणेकरांसाठी केवळ १२ टीएमटी बस

ठाणे :सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टच्या (सीआयआरटी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात १ लाख लोकसंख्येसाठी ३० बस आवश्यक आहेत. ठाण्याची लोकसंख्या २४ लाखांपर्यंत पोहोचल्यामुळे या शहराला ७२० बसची आवश्यकता आहे. परंतु अवघ्या २८६ म्हणजेच निम्म्यापेक्षाही कमी बसवर ठाणेकरांची भिस्त आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये ४६७ बसगाड्या आहे.