मुंबई: पुणे जिल्ह्यातील रांजणगावात एका कार्यक्रमात अभिनेत्री मानसी नाईकचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून मानसीच्या तक्रारीवरून मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरुर तालुक्यातील रांजणगावात युवा सेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मानसीला आमंत्रित करण्यात आले होते. तिथे स्टेजवर मानसी सादरीकरण करत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले व दमदाटी करून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मानसीच्या तक्रारीच्या आधारे तीन जणांवर कलम ३५४ व ५०६ अन्वये साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
मानसी नाईकचा विनयभंगतिघांवर गुन्हा दाखल